कधी कधी आपल्याला एखाद्या काळ्या कुट्ट अंधारात ढकलले जाते पुन्हा नव्याने जन्म घेण्यासाठी पण हे ढकलणे म्हणजे जमिनीत पेरलेल्या बिया सारखे असते आणि आपल्या अंगी-भूत गुणांवर ठरते हारुन कुजून जायचे की लढून रुजुन रोप बनायचे.
काळाने जरी फेकले तुला…
एकट्याला गर्द काळ्या गर्भात,
विसरू नको त्या बियाणाला…
पेरले ज्याला मातीच्या पोटात.
संधी दिली पुन्हा नव्याने…
जन्म घेण्या राखेतून,
परिस्तिथीला नको देऊ दोष …
उभारून ये परत त्या गोटातून.
तुझ्या अंगीचे गुण तूच जाण…
अन ठरव हारून कुजून जायचे की,
परिस्तिथीशी दोन हात करून…
गर्भातून रुजुनच बाहेर पडायचे. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #poem #maharashtra #pune #poetry