All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Friday, August 19, 2016

माझा शाळेतला पहिला दिवस...

माझा शाळेतला पहिला दिवस …

    माझं शालेय शिक्षण भिवंडी येते झाले आहे. भिवंडीमध्ये आमच्या जवळची आणि मुळात वडील ज्या कंपनीत कामाला होते त्याच मालकाने स्थापन केलेली शाळा. आधीच नाव शिशुविहार विद्यालय असे होते नंतर म्हणजे मी ८-९ इयत्तेत असेल तेव्हा गणवेष आणि नाव दोन्ही बदलण्यात आहे तेव्हा आताचे नाव आहे माननीय गोपाळ गणेश दांडेकर विद्यालय (D .D .V.). वडील कामाला होते ती कंपनी G.G. Dandekar Machine Works. साहजिकच वडील मला त्याच शाळेत शिकायला टाकणार हे वेगळे सांगायाला नको.

    असो हा झाला माझ्या शाळेचा थोडासा तपशील. मला थेट पहिल्या इयत्तेत टाकलं होतं त्यामुळे माझा पहिला दिवस पहिलीतला असचं म्हणावं लागेल. मला आठवतंय आई शाळेत सोडायला आली होती. त्यावेळी एक छोटं दप्तर होत आणि खायला म्हणून पार्ले जी बिस्किटचा पूड दिला होता. तसं मला ऐकून की बघून पण हे  माहिती होत की शाळेची घंटा वाजली की घरी येयच. आई मला शाळेत सोडून घरी गेली मी रडलो की नाही ते आठवत नाही. पण मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि मी माझं दप्तर आवरलं बिस्किटचा पुडा घेऊन थेट निघालो घरी आणि एकटाच बिस्कीट खात खात घरी पोचलो. आई एकदम आश्चर्यचकित कारण मी लवकर घरी आलो होतो आणि तोही एकटाच. घंटा झाली म्हणून मी घरी आलो हे सांगितल्या वर आई हसली आणि मला नीट सगळं सांगितली मधली सुट्टी होती ती त्यात खाऊ खायचा असतो आणि बाकी बराच काही. दुसऱ्या दिवशी आईने मास्तरांना घडलेली गोष्ट सांगितली… मास्तरांना पण गंमत वाटली आणि त्यानंतरच सगळं आलबेल होतं जे इतकं खास असे आठवतही नाही.

तर हा होता माझा शाळेचा पहिला दिवस…. - हर्षद कुंभार