क्रिकेट म्हणजे सचिन हे सर्वमान्य समीकरण बनले आहे. सचिनचा सामना पाहणे ही पर्वणीच असायची . जी मी देखील अनुभवली आहे .हल्लीच झालेल्या IPL स्पर्धांमधील MI V/s RCB सामना डोळ्यात साठवून ठेवला आहे , सचिनला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा अविस्मरणीय आनंद घेता आला. सचिन मैदानात जरी आला ना मग ते प्रत्यक्ष खेळायला असो वा सराव असो, सचिन !!! सचिन !!! घोषाने स्टेडीयम दणाणून जाते. अंगावरच लव पेटून उठावे तसे रोम रोम जोशाने भरून उठते. प्रत्यक्ष हा अनुभव हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडीयममध्ये घेतल्यानंतरच तुम्हाला कळेल. पण आता सचिन नसेल खेळायला असतील त्या फक्त त्याच्या आठवणी. आणि आठवणी कधीच रिटायर होत नाहीत. सचिन ने जेव्हा एकदिवसीय सामन्यात २०० केले तेव्हा त्याच्या गौरव प्रित्यर्थ एक कविता केली होती.
कधी शांत तर कधी खवळलेला…
आरसा हा समुद्राचा,
कधी नम्र तर कधी कठोर…
स्वभाव या व्यक्तिमत्वाचा.
कधी गुणी शिष्य एका गुरूचा…
तर कधी गुरु हा नवोदितांचा,
कधी अपयशी तर कधी विजयी…
बादशाह हा विक्रमांचा.
दिसत असला लहान साधा तरी…
काळ सगळ्या गोलंदाजांचा,
निरंतर खेळत रहा तू सदैव…
हाच निरोप आहे प्रत्येक चाहत्याचा.
सातासमुद्रापार घेवून गेलास मराठीचे नाव…
हा परिणाम आहे तुझ्या विक्रमांचा,
ओळखायला क्षण आहे पुरेसा…
कारण तसा प्रवास आहे आपल्या सचिनचा.
सचिन तेंडूलकरचा असेल…
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान,
क्षितिजावर चमकणाऱ्या ताऱ्यासम…
सदैव असेल त्याचा सम्मान - हर्षद कुंभार.
सचिनसम तोच, दुसरा सचिन होणे नाही…विविध वाक्यांनी सन्मानित कारकीर्द असलेला सचिन घरातला कोणी एक वाटतो. त्याच शांत आणि नम्र बोलन लक्ष वेधून घेते. सामान्य व्यक्तीमत्व असामान्य ओळख. अशी ओळख त्याच्या कारकिर्दीतल्या कर्तुत्वाने निर्माण केली आहे. त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेछ्या- हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment