" चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा." - प्रदीपकुमार केळकर
मुळ विचार प्रदीपकुमार केळकर यांचे आहेत . त्यांच्या इच्छेनुरूप मी त्यांच्या प्रगल्भ विचारांना काव्यरूप दिले आहे. त्यांच्या अनुमतीने मी
केलेली ही कविता तुम्हाला अर्पण करत आहे मित्रांनो.
चेहेऱ्याचे रंग रूप...
असो कितीही छान,
मनाची सुंदरताच...
शेवटी करते महान.
कलुषित, ग्रासलेल मन...
न देई कसलीच सुंदरता,
फासून लाख प्रसाधने...
न येईल ती उदारता.
पवित्र,शुद्ध विचारी मन...
करील आनंदी चारही दिशा,
नातलग,मित्रपरिवारात...
नांदेल सुख-समाधानाचा वसा.
ईश्वर मनी तेच असते...
जे तुम्ही चिंतिता,
स्वच्छ मनी वाहुद्या...
सदा सुविचारांचा झरा. - मुळ विचार (प्रदीपकुमार केळकर) , कविता अनुवादन (हर्षद कुंभार)

No comments:
Post a Comment