फक्त कविता आणि लेख यासाठी हा ब्लॉग समर्पित आहे. जितके माझ्या मनाने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते सारे यात आहे. नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद ...
All The Contents by Labels
Books Review/ पुस्तक परिक्षण
(1)
qoutes /सुविचार
(1)
इतर कविता
(23)
इतर कविता / General Poems
(83)
कविता/Poem
(1)
प्रेम कविता / Prem Kavita
(59)
प्रेम कविता /Love Poems
(3)
प्रेरणादायी कविता
(3)
प्रेरणादायी कविता / Inspiring Poems
(9)
मराठी कविता / Marathi Kavita
(1)
मराठी कविता / Marathi Poetry
(1)
मराठी कविता / Poems
(1)
मराठी कविता /Marathi Poem
(1)
मराठी कविता /Marathi Poetry
(2)
मराठी लेख / Articles
(1)
मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा
(2)
मराठी सुविचार /Quotes
(1)
मैत्रीच्या कविता
(7)
मैत्रीच्या कविता / Friendship Poems
(10)
लेख /Articles
(4)
लेखन
(8)
लेखन / Marathi Lekhan
(54)
विचार / thoughts
(1)
विडंबन कविता
(2)
शायरी
(1)
सुविचार / One Liner
(2)
सुविचार / Quotes
(2)
सुविचार /Quotes
(7)
सुविचार/Quotes
(1)
हिंदी / Quotes
(1)
हिंदी Quotes
(1)
हिंदी कविता / Hindi Poems
(2)
हिंदी कविता /Hindi Poems
(3)
हिंदी कविता /Poems /Quotes
(1)
हिन्दी कविता / Hindi Poems
(2)
Saturday, March 17, 2012
Saturday, March 10, 2012
S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर
S . T . महामंडळातील काही मायकल शुमाकर
लेख लिहायला मलाना काहीही विषय पुरेसा असतो. एखादी गोष्ट मनात घर करून बसली की झाले त्यावर काहीतरी लिखाण करायचे हे नक्कीच होते माझे. आता हा लेख लिहायचे कारण माहित नाही पण जेपण लिहीन ते तुम्हाला आवडेल हे खात्रीने मी सांगू शकतो. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला कारण हे असतेच. तर हा लेख लिहायचे कारण आहेत S . T . महामंडळातील काही चालक. आता तुम्ही म्हणाल यात काय लिहायचे लेखाच्या नावावरून कळतेच आहे की ते फास्ट चालवत असणार गाडी म्हणून.
मला ही माहित आहे या एका ओळीतल्या गोष्टीला मी माझ्या शब्दात बांधून मांडेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणाल वा काय लिहिले आहे.आता बघा ना अजून मुळ मुद्द्याला सुरुवात झाली नाही तरी किती लिहून झाले. बर बर आता जास्त पण पकवत नाही तुम्हाला. तर करूया सुरुवात
मला जॉब लागला तेव्हा पासून माझा आणि S . T . महामंडळाचा संबंध आला आहे. म्हणजे गेले ३ वर्ष मी S . T . महामंडळाच्या सेवेचा वापर करतो आहे. महामंडळात खूप चालक आहे जे आता ओळखीचे झाले आहेत , हो म्हणजे चालकाला ओळखून आम्ही समजतो ही आपली गाडी आहे ते. माझा प्रवास हा भिवंडी ते बोरीवली असा आहे रोजचा ज्यात साधारण १.५ तास हा लागतोच, म्हणजे हे एकदम सरासरी आहे बरे. हान आता ट्राफिक असेल तर मात्र २ तासाच्या वरच लागतो.
काही चालक तर अक्षरशा वैताग आणतात त्या प्रवासाला , हो अहो ते इतके स्लो चालवतात की वीट येतो नुसता वाटते कधी पोचतो देव जाणे. आणि हे असे चालक २ तास घेतातच इच्छित स्थळी पोचवायला. खरतर आम्ही ना चालक बघून गाडीत बसतो कारण नंतर उगाच बोर होण्यापेक्षा न बसलेलेच बरे नाही का. पण कधी कधी नाईलाज असतो आमचापण.
हान आता S . T . महामंडळातील खरे हिरो ज्यांना आम्ही पायलट नाहीतर मायकल शुमाकर असे बोलवतो. अर्थात त्याला संदर्भ पण तसाच आहे. अहो हे पायलट न खरच कुशल आणि तरबेज आहेत गाडी चालवायला. हे सरासरी ज्या रोडने १.५ तास लागतो न त्याच रोडने १ तासाच्या आत गाडी आणतात बोला. आणि हे गाडी चालवत असताना तुम्हाला कितीही झोप आली असेल तरी तुम्ही झोपूच शकत नाही कारण ते इतके फास्ट चालवत असतात की कुठेतरी धरून बसावे लागते. ह्याला मागे टाक त्याला टाक करताना जी रेसिंग पाहायला मिळते ती वेगळीच आणि जोश भरणारी असते. जर तुम्ही कुठे धरून बसले नाही ना तर वळण मार्गावर बसल्या जागेवर आडवे झालात म्हणून समजा. आणि मुख्य म्हणजे यातल्या काहीना तर २५ वर्ष गाडी कुठे न धडकावता वा ठोकता S . T . महामंडळामध्ये सेवा केल्याबद्दल त्यांना बक्षीस मिळालेले आहे.
खरतर या गोष्टी तुम्हाला इतक्या महत्वाच्या नसतीलही पण माझ्या सारख्या रोज प्रवास करणाऱ्या मित्रांसाठी असेल कारण लवकर इच्छित स्थळी लवकर उतरणे सर्वात महत्वाचे नाही का. कालच मी फास्ट रेसिंग चा अनुभव घेतल्याने हा लेख लिहावा हे निश्चित झाले होते माझे. मला अशा आहे की तुम्हाला लेख नक्की आवडला असेल आणि तुम्ही हे वाचताना बोर झाला नसेल. चला परत भेटू नवीन विषयासोबत नाहीतर माझ्या कविता तर आहेतच तुमच्यासाठी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
Thursday, March 8, 2012
"शाळा" पाहिल्यानंतर
"शाळा"
खरच बोकिलांची "शाळा" भाग पडते आपल्याला शाळेत पुन्हा बसायला. पुन्हा सगळे ते क्षण आठवायला खरच भाग पडते ही "शाळा" ही कलाकृती विचार करायला. मी जेव्हा "शाळा" पाहत होतो खरच मलाही असे वाटत होते की मी त्या शाळेतला एक विद्यार्थी आहे.
वर्गात प्रार्थना असताना केलेली धमाल, खरच तसेच जसे काही सर्व आता समोर "शाळा" पाहताना वाटले. प्रार्थना करताना केलेल्या दंगेमुळे खाल्लेला मार ही आठवतो. प्रतिज्ञा चालू असताना हात दुखावल्या मुले समोरच्याच्या खांद्यावर हाताला थोडा आधार देणे असे अनेक किस्से आठवले. माझे ही शाळेतले दिवस अगदी जोश्या सारखेच होते. जोश्याच्या जगी मी स्वतः ला पहिले होते.
मला माझा गृहपाठ केला नाही तर मार बसेल की काय "शाळा" पाहताना वाटले. इतिहासाचा तास ज्यात मलाच वाचायला सांगायचे तेव्हा, वाटले की या "शाळेतले" सरपण मलाच सांगतील आता धडा वाच म्हणून. इंग्लिशची मात्र माझीही बोंब होती जशी यात सुऱ्या आणि पवार यांची होती. आम्हाला खास असे कुणी नव्हतेच इंग्लिश शिकवायला कुणीतरी येयचे काही दिवस शिकवायचे की जायचे, अन असेच वर्ष संपायचे.
विज्ञानच्या वर्गाला तर तेव्हा मैडम त्यांनी नवीन पद्धत काढली होती आम्ही मुलांनी आधीच उद्या शिकवणाऱ्या धड्याच वाचन करून येयचे, आणि दुसऱ्या दिवशी मैडम आधी आम्हाला प्रश्न विचारणार त्यातले आणि आम्ही उत्तर सांगायचे, अर्थात सुरुवातीला त्याचे काटेकोर पालन केले आम्ही, नंतर मात्र एक शक्कल केली , बाकाखाली पुस्तक धरून थोडासा संदर्भ घेवून मैडम ने विचरले त्याबद्दल थोडे बोलले की झाले, त्यामुळे मैडम च्या नजरेत आम्ही हुशार ठरलो होतो म्हणजे होतोच आम्ही.
शाळेत असताना आम्हाला आठवतंय जसे सुऱ्या आणि इतर त्यांच्या बाईंकडे बघायचे तसेच काहीसे आमचेही होते. आम्हाला एक बाई होत्या त्या खूप आवडायच्या, त्यांचा वर्ग चालू असताना आम्ही फक्त आ वासून त्यांना बघतच राहायचो अर्थात त्यांची नजर चुकवून.
आज "शाळा" पाहतानापण त्या सुऱ्या अन पवार यांच्यासोबत मागल्या बाकावर बसल्यासारखे वाटले.
जोश्याची जशी लाईन होती तशीच माझीपण होती बर का आणि जोश्याने मारलेला डायलॉग "आपल्या लाइन कड़े बघणे ही एक सुद्धा कला आहे, लाइन ला पण नाय कळला पाहिजे... की आपण तिच्याकडे बघतोय, समोर मैडम क़िवा सर आले ना... तरी पण, आपल्याला आपल्या लाइन कड़े बघता आला पाहिजे... कळला काय . . . " . अगदी तंतोतंत आहे. फक्त फरक एक होता जोश्याने शिरोडकरला बोलून दाखवले होते की ती त्याला आवडते , तेव्हा माझे काही धाडस झाले नव्हते सांगायचे.
शाळेतली गेलेली एकच ट्रिप सारखी आठवते, तेव्हा ५० /- मध्ये आम्हाला मुंबई दर्शन घडवले होते. नेहरू तारांगण, महालक्ष्मी , म्हातारीचा बूट , नेहरू उद्यान, हे सारे आठवते. या "शाळा" मधील त्यांचा गेलला कॅम्प याची आठवण करून देतो.
"शाळा" जेव्हा संपतो तेव्हा एक नवीन पडदा डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला आपल्या शाळेत घेवून जातो. शाळेतले सर्व दिवस नजरेसमोर उभे राहतात. " शाळा " जेव्हा शेवटला पोचतो तेव्हा मन उदास अन खिन्न होते, शिरोडकर ते गाव सोडून गेलेली असते , सुऱ्या अन पवार नापास झाल्याने जोश्या पासून वेगळे होतात. शेवटी एकटाच जोश्या राहतो. यांची पुढची कथा आपण जोडू पाहतो, पुढे असे होईल तसे होईल करून "शाळेचा" शेवट आपल्या परीने पूर्ण करतो.
- हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )
Monday, March 5, 2012
Subscribe to:
Posts (Atom)