All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) आजचे जग (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख (1) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख (1) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) वास्तविकता (1) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, March 17, 2013

मन शांत आहे


मन आजकाल इतकं
शांत आहे कि…
कसलीच तक्रार त्याला
नाही तिच्याकडून…

जेव्हा उदास असतं
हे मन तेव्हाच लिहिते…
तेव्हाचं शब्दांच्या
मागे धावते…

मनातली चलबिचल
तुमच्यापुढ मांडते…
भावनांची घुसमट
मनातून काढते…

पण आज ते शांत
जणू तरंगरहित पाणी…
न कसली चिंता कि
कसली आसक्ती मनी…  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, March 9, 2013

Happy Women's Day - Harshad kumbhar

Happy Women's Day - Harshad kumbhar  


Saturday, March 2, 2013

Premachi Pahaat

Premachi Pahaat - Harshad kumbhar

Saturday, February 23, 2013

धुंद क्षणी… - हर्षद कुंभार


Saturday, February 9, 2013

- बालक - पालक अर्थात BP. -

 - बालक - पालक  अर्थात BP. -

काल हा चित्रपट पाहण्याचा योग आला. कालपर्यंत जे काही या चित्रपटाबद्दल ऐकले , वाचले ते खरंच अनुभवले.
म्हणतात ना तुमचे बालपण तुम्हाला नेहमी खुणवत असते आणि चिडवत देखील , कारण गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असच आपण नेहमी म्हणत असतो. आपल्या बालपणाशी साधर्म्य साधणारे काही तुम्हाला दिसले किव्वा वाचण्यात आलं की कसं छान वाटत ना. जेव्हा शाळा चित्रपट पाहिला तेव्हापण असच काहीसं झालं होत आणि तेव्हाही जुन्या आठवणींचे गलबत काळाच्या पडद्यामागं अलगद तरंगत गेल होत. 
" बालक पालक " विषय अतिशय नाजूक आणि तितकाच महत्वाचा. म्हणजे बालक आणि पालक यांना लैंगिकते 
बद्दल मोकळेपणाने बोलावे या बद्दल अजूनही धीर होत नाही म्हणा किव्वा तसे माध्यम नाही. चित्रपटात जे दाखवले अगदी तसच काही घडत नाही पण त्याच्याशी मिळते -जुळते असे घडलेले असते. सगळ्यांना ते आठवलेच असेच त्यांनी केलेले उपद्व्याप नाही का ?. आमच्या वेळेस पण नेट किव्वा मोबाईल इतका प्रचलित नव्हता. त्यामुळे प्रश्नही आमचेच आणि उत्तरेही आमचीच. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात "विशू" नावाचं पात्र पण असेल. ज्या त्या काळात मुलांनी अश्या प्रश्नांवर स्वतः आणि कुवतीप्रमाणे शोधलेली उत्तरे आहेत आणि असतील. त्या काळातलं निभावल आम्ही आणि आधीच्या पिढ्यांनी. 
पण आताची पिढी आणि नंतर येणारी पिढी त्याचं काय. त्यांना कुणीतरी हे नाजूक वळण सावधगिरीने आणि संयमाने कसे पार पाडायचे ते कोण सांगेन ही जबाबदारी नवीन पालकांवरच आहे ना.  तेव्हा मुलांसोबत लहानपणापासूनच मित्रवत राहा,
वागा म्हणजे ते न घाबरता तुमच्याशी सवांद साधू शकतील नाही का ? मुलाचं वयात येण पालकांना जाणवत नाही अस आहे काही नाही ना, मग आपल्या मुलांकडे आपल्यालाच पहाव लागणार ना. तुमच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या बाबतीत घडू नये म्हणून पालकांना नव्या पिढी सोबत जुळत घ्यावं लागेल. विचारात फरक पडला की माझ्या लेखाचं चीज झालं असे मी समजेन 
हं पण तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जर तुम्ही पालक असाल त्याच वर्गवारीत मोडणारे तर आपल्या पाल्याला सोबत घेवून जा. - हर्षद कुंभार   
      

Sunday, January 27, 2013

एका ताऱ्याची भेट....

एका ताऱ्याची भेट....
 
मुंबई मध्ये राहणाऱ्या सर्वांनी कधी ना कधी एका तरी एकदातरी सेलेब्रेटीला पाहिलं असेल. तसं मीपण पाहिलंय पण ही भेट वेगळीच होती.
तर किस्सा असा आहे...
दिनांक : १७ - ०१ २०१३      
वेळ : ११.०० - ११.३० सुमारास 
ठिकाण : गोरेगाव (पूर्व)  हब मॉलच्या मागील रोड.

           मी आणि माझे ऑफिसचे मित्र रोजनिशीप्रमाणे चहा पिण्यासाठी आलो होतो. त्याच रोड लगत चहाची टपरी आहे. तर आम्ही चहा घेत निव्वळ ऑफिसच्या महत्व नसलेल्या गोष्टींवर बोलत असताना एक गाडी आमच्या जवळ येवून थांबली. त्या गाडीतील व्यक्तीने आम्हाला हटकून 
एका पत्त्याबद्दल विचारणा केली. अर्थात ती व्यक्ती त्या रोडवरील जवळचा एक पत्ता विचारत होती. आम्ही ५ मित्रांमधील मी आणि अजून एका मित्राने त्यांना प्रतिसाद दिला. माझा मित्र त्यांच्याशी बोलत असताना मला मात्र एक कोडं पडल यार यांना कुठेतरी पाहिलंय. आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला 
आणि थोडा पुढ होत त्यांना विचारलं तुम्ही " आशिष पवार " ना ? आणि त्यांनी " हो ". अरे सॉलिड म्हंटल आणि त्यांच्याशी हस्तांदोल करून त्यांना 
नेमका पत्ता सांगितला आम्हाला जितका माहित होता. ते एका चित्रीकरण स्तळाबद्दल विचारत होते. ते घाईत असल्याने लगेच गेले. आणि आमचा ऑफिस चा तो विषय सोडून मग आम्ही "आशिष पवार " बद्दल बोलू लागलो, अर्थात जे लोक E -TV  वरील " Comedy Express " बघत असतील त्यांना कळले असेल " आशिष पवार " कोण आहे ते. पण छान वाटले तेव्हा खरच मराठी नटांमध्ये विनोदी जगतात " आशिष पवार  " याचं नाव खूप मोठ आहे. आणि त्यांच्याशी झालेली ही अचानक भेट खूप सुखद होती. - हर्षद कुंभार 

Sunday, January 6, 2013

Ek Prem Kavita


Thursday, November 15, 2012

एकालाच जमलं वाघ होयला....

एकालाच जमलं वाघ होयला. - हर्षद कुंभार 

Sunday, November 11, 2012

लहानपणाची दिवाळी


सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या खूप खूप शुभेछ्या. आनंदी रहा सुखी रहा  


लहानपणाची दिवाळी आठवते सगळ्यांना ? 
माझ्या या एका प्रश्नार्थक वाक्यानेच तुम्हाला तुमचे दिवाळी साजरी केलेले लहानपण आठवले असेल. हो कि नाही.
दिवाळीच्या काळात तुम्ही खूप दिवाळी अंक आणि लेख वाचले असतील पुस्तकात नाहीतर कोणत्यातरी वेबसाईटवर.
मी तुम्हाला माझ्या लहानपणाची दिवाळी सांगणार आहे. बघा बर तुमच्या लहानपणाशी मिळती जुळती आहे का ते.

तर सुरुवात करूया चला तर मग आपल्याला १२ वर्ष मागे जावे लागेल.
अर्थात जे मी काही सांगणार आहे ते सगळे शालेय कालखंडातले आहे बर का !
शाळेत परीक्षेचे वेळापत्रक लागले की आधी संपते कधी या गोष्टीवर जास्त भर असायचा.
कारण दिवाळीच्या सुट्टीची सगळेच आतुरतेने वाट पाहत असायचो . कधी एकदाचे पेपर संपतील असे होयचे.
आणि एकदा कि पेपर संपले कि बास नुसता धुडघूस असायचा आमचा चाळीत.
हो चाळीतच अर्थात दिवाळीची खरी मज्जा ही चाळीतच येते हे वेगळे सांगायला नको नाही का.
सर्वात आधी गेल्या दिवाळीची पिस्तुल आहे का ते शोधायचे काम आम्ही करायचो. ती चांगल्या अवस्तेत असेल तर ठीक नाहीतर बाबांच्या मागे लागून नवीन घेयचीच. 
मला आठवतंय एकदा बाबांनी मला एक लोखंडी पिस्तुल आणली होती ती एकदम खरी पिस्तुलासारखी दिसायला होती आणि ते गोळ्या भरायचे हे तसेच होते फिरायचे ते गरगर.
दिवाळीच्या आधीच त्या पिस्तुलांनी आम्ही चोर - पोलीस खेळायचो. टिकल्या बंदुकीत भरून कंटाळा आला की एक कागदावर सगळ्या जमा करून 
तो कागद पेटवायचा त्यात काही औरच मज्जा असायची. टिकल्यांची रीळ असली की निरनिराळ्या पद्धतीने त्या फोडण्याचा आमचा प्रयत्न असायचा.
जसे की नट आवळायची पक्कड घेयाची त्यात टिकली धरून फोडायची.
नाहीतर रीळ घेवून थोड्या रफ जागेवर बोटाने जोरात घासायची आणि टिकली फोडायची. असे आणि असेल प्रकार आम्ही करायचो  
हे सगळे दिवाळीच्या आधी बर का. बाबा दिवाळीच्या आदल्या रात्री कधी फटाके आणायचे हे कधी कळले नाही आम्हाला. 
पण सकाळी लवकर उठून सर्वात आधी आम्हाला फटाके दाखवून 
लवकर उटन लावून अभ्यंगस्नान करायला लावायचे. तेव्हा अभ्यंग स्नानाचा खूप कंटाळा येयचा ते खरखरीत उटन आईला अंगाला लावायची अगदी नको वाटायचे ते.
पण महत्वाचे हे होते कि चाळीत सर्वात आधी उठून पहिला फटका कोण फोडणार. जणू शर्यंत लागली असायची तेव्हा. थोडा अंधार असे पर्यंत फटाके फोडायचे. 
फटाके पूर्ण माळ आम्ही फोडलेली आठवत नाही उलट माळ सगळ्या सोडवून एक एक फटका फोडायला खूप आवडायचे. तो फटका पण कसा फोडायचा माहितेय 
कुठ भिंतीत फट असेल तर तिथे खोचून फोडायचा. नाहीतर फटाक्यांचे रिकामे खोके घेयचे त्याच्यात ठेवून फोडायचा. अहो आम्ही तर काय करायचो माहितेय 
पिठाच्या गिरणीतून खाली पडलेले पिठी पिशवीत आणायचे. आणि मुठभर पीठ खाली जमिनीवर ठेवायचे त्यात एक फटका खोवायचा आणि मग फोडायचा. 
ते अक्षरशः चित्रपटातल्या दृष्यागत वाटायचे फुटताना आगीचा एक लोट उठायचं तेव्हा. खूप करामती केल्या त्येवेळेस आता आठवले कि फार छान वाटते.
चाळीत अजून एका गोष्टीची शर्यत असायची कुणी जास्त फटाके फोडले आणि त्यासाठी आम्ही एक शक्कल लढवायचो. रात्री गुपचूप आजूबाजूचा फटाक्यांचा कचरा स्वतःच्या घरासमोर 
आणून ठेवायचा म्हणजे दुसऱ्याला वाटेल अरे किती फटके फोडलेत याने. मुळात दिवाळी या गोष्टीवर थांबत नाही अजून खूप काही असते. सुट्टी संपेपर्यंत बाकी गोष्टी इतक्या लक्षात राहण्यजोग्या 
नव्हत्या किव्वा नसतील म्हणून ठळक काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.  
आठवणीतले बरेच क्षण सांगण्याचा मी प्रयत्न केला. अर्थात तुम्हाला जे नक्कीच आवडले असेल. आणि तुमचे बालपण तुम्हाला आठवले असेल अशी अशा करतो. तुम्ही केलेल्या काही अतरंग गोष्टीपण  असतील नाकी कळवा.  - हर्षद कुंभार                

          
                  


  

  
     

Saturday, October 13, 2012

प्रेम म्हणजे फक्त ...

प्रेम म्हणजे फक्त ...
सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी होताना पाहणे का ?

प्रेम म्हणजे फक्त ...
दिवस रात्र तिच्याच गोष्टींमध्ये गुंतून राहणे आणि सतत ती जवळ असावे असे वाटणे 
तिच्याशी बोलू वाटावे असे कि जसे जग फक्त दोघांचे आहे?

प्रेम म्हणजे फक्त ...
हेच कि ज्यात गुलाबाच्या फुलाला, विशिष्ट रंगाला अती महत्व येण . साऱ्या
नाजूक भावना जणू
फक्त त्याच काळात जन्माला येण. आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय या भावनेने जगत राहण ?

प्रेम म्हणजे फक्त ...
ज्यात आपण विरहाच्या दुखाने साथीदाराशी बोलताना चंद्र ,सूर्य, ताऱ्यांचे नजराणे देत असतो.
प्रत्येक ती गोष्ट जी तिला आवडते त्यासाठी स्वतःच हट्ट धरणे. तिला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते
करू असे या ताकतीने भरून येणे.?

अशीच असते का प्रेम कहाणी ? कि अजून काही - हर्षद कुंभार