पार्टनर - वपु
"वपुमय होताना" कधी वाटले नव्हते वपु वाचनात येतील अगदी काही दिवसापर्यंत त्यांचे एखाद-दोन ओळी नेहमी वाचनात येत होत्या. ठरवून असे कधी त्यांचे पुस्तक घ्यावे असे वाटले नाही. काही दिवसांपूर्वी शॉपिंग गल्ली मध्ये त्यांचे लाल भडक असे पार्टनर पुस्तक नजरेस पडले, पुस्तकाच्या रंगाने खर लक्ष वेधून घेतले. सहज उचलून पाहिले आणि पार्टनर म्हणजे वपु हे समीकरण काय याचे कुतूहल म्हणून मी ते खरीदी केले. पुस्तक घेऊन पण खूप दिवस झाले पण त्याला हात लागत नव्हता, जाणून-बुजून असे काही नव्हते पण वपु म्हणजे त्यांचा पिंड च वेगळा जो कधी न पाहिलेला की अनुभवलेला त्यात माझ्यावर प्रभाव हा जास्त करून व्यंकटेश माडगूळकर यांचा. पण काल असेच कपाट लावताना पुस्तक दिसले आणि सहज बघूया प्रस्तावना पासून सुरु झालेला पार्टनर कधी वाचून संपला हे देखील कळले नाही.
पार्टनर ही जादूच आहे असेच म्हणावे लागेल. श्री पार्टनर हा आपल्यातला एक आहे असेच जाणवते. श्री सोबत सहज प्रसंगांना उपस्थित राहिल्यासारखे वाटते. श्री चा पार्टनर कधी कधी आपण होतो तर कधी खुद्द आपण श्री होतो जो पार्टनर सोबत बोलत असतो. रोजच्या गोष्टींमध्ये आपण ही हरवतो आपलेच जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. पार्टनर हात धरून आपल्याला भूतकाळात घेऊन जातो ही गोष्ट श्री ची आहे की आपली यात काहीच फरक उरत नाही. डोंगरेची गोष्ट चटका लावून जाते आणि जीवनातील हे चढ उतार बरेच काही शिकवून जातात. अनुभवायला खूप काही आहे तेव्हा एकदा तरी पार्टनर सोबत ही सैर नक्की करा. - हर्षद कुंभार
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #books #literature #bookreading #vapu #vapukale #marathimulga #writingcommunity #writing #पुस्तके #pustake