नोकरीला लागल्यापासून तसं वाचन कमीच झाले होते. वाचन म्हणजे फक्त अभ्यास नवनवीन शिकण्यासाठी केलेला खटाटोप होता. गेली ७/८ वर्ष तरी साहित्य वाचन हे झालेच नव्हते त्यात कामाच्या वेळेमधून अवांतर वाचन करणे ही वेगळी कसरत असते. फेसबुकला २ वर्षांपूर्वी पुस्तक-बुस्टक या ग्रुप मध्ये जॉईन झालो आणि जसे चित्रपटाचे रिव्हिव येतात तसे पुस्तकांबद्दल मिळत गेले. तेव्हा पासून मी माझी एक वाचन लिस्ट बनवत गेलो.
याच वाचन माळेतली २ पुस्तक मी या वेळी मी अगदी परिस्थितीसोबत आणि स्वतःविरुद्ध हट्ट करून मागवून घेतलीच. माहित नव्हते वेळ मिळेल की नाही पण एकदा पुस्तक हाती घेतली की खऱ्या वाचकाला त्याचे व्यसन लागते. यातून जमेल तर दिवसातून २० मी. नाहीतर ३० मी. जागून मी पहिले पुस्तक पूर्ण केले ते होते
१) “शोध” - मुरलीधर खैरनार - या कादंबरी बद्दल आधीच खूप लोकांनी लिहून ठेवले आहेच त्यामुळे मी जास्त काही लिहीत नाही पण तुम्ही एकदा नक्की वाचाच असे मी सांगेन. मुरलीधर आज हयात नाही पण ते या कादंबरीच्या रूपाने कायम स्मरणात राहतील. त्यांनी लिहिलेलं कथानक एखाद्या रंजक चित्रपटाला शोभेल असेच आहे. मुळात तेच सिनेसुर्ष्टीसोबत जोडलेले असल्याने त्यांनी मुद्दाम कथा आणि पटकथा पद्धतीने ते लिहिले आहे उद्या यावर कोणी चित्रपट काढला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही. त्यांची कल्पना शक्ती आणि वास्तवाचा जोड इतकी अप्रतिम झाली आहे की खरेच असे काही झाले असेल या मतापर्यंत आपण येऊन पोहोचतो. इतिहासातील सुरत दुसऱ्यांदा लुटली त्याची घटना केंद्रसाठी ठेवून ती अर्ध्यापेक्षा जास्त मधेच कुठे गहाळ झाली त्याचा शोध आजच्या काळात घेतला गेला आहे. भौगोलिक ज्ञान अत्यंत शिताफीने वापरून प्रसंग अगदी जिवंत केले आहेत. रंजक कथेला हवे असलेले सर्व धागेदोरे पद्धतीशीरपणे उलघडत त्यांनी रंजकता शेवट पर्यंत कायम ठेवली आहे. सर्व संदर्भ पूर्ण इतिहास जाणीवपूर्वक आणि तपासून वापरला गेला आहे त्यामुळे कुठेच अतिशयोक्ती, अवास्तव वाटत नाही. जास्त काही सांगत नाही पण तुम्ही स्वतः वाचावी म्हणून नक्कीच सांगेन.
#KshanKahiWechalele #harshadkumbhar #marathi #novel #muralidharkhairnar #marathi #books #literature