एक ग्रह मनात आहे,
विचारांच्या वलयावर फिरणारा…
आणि एक दुर अवकाशात,
आपल्याच धुंदीत रमणारा…
एक ग्रह मुक्त आहे,
सर्वच बाबतीत…
अन एक मनात,
सदैव बंदिस्त आणि ग्रासलेला…
एक ग्रह ठरवतो म्हणे,
आपले भविष्य….
अन एक दर्शवितो आपली
वर्तमान मनस्थिती….
एका ग्रहाला तमा नाही,
अस्तित्वाची, जाणिवांची…
आणि एक मात्र विसंबून,
त्यावर चित्र बदलेल काही… - हर्षद कुंभार (१३/०९/२०१७ )