All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) Current Affairs (1) Ghazal (1) Life Hacks (2) Life Style (2) Marathi (1) qoutes /सुविचार (1) Traveling Spots (1) Trending Topics (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (84) कविता (4) कविता/Poem (2) ग़ज़ल (6) चालू घडामोडी (10) चालू घडामोडी /Current Affairs (8) चालू घडामोडी/Current Affairs (9) जीवनशैली (13) प्रेम कविता / Prem Kavita (60) प्रेम कविता /Love Poems (4) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (10) मराठी (6) मराठी कविता (6) मराठी कविता / Marathi Kavita (2) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (3) मराठी ग़ज़ल (4) मराठी लेख / Articles (18) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (3) मराठी सुविचार /Quotes (1) मुक्तछंद (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (18) लेख Marathi Lekhan (3) लेखन (10) लेखन / Marathi Lekhan (57) विचार / thoughts (2) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, June 30, 2012

मी नेहमी तुम्हाला ...

मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या सौंदर्यात भुलवतो,
तुम्ही तिला पहिले नसताना...

मी नेहमी तुम्हाला ...
तिच्या शब्दांमध्ये गुंतवतो,
तुम्ही तिला ऐकले नसताना...

मी नेहमी तुम्हाला...
तिला माझ्या काव्यातून दाखवतो,
तुम्ही तिला ओळखत नसताना...    

मी नेहमी तुम्हाला...
आमच्या प्रेमात जगवतो,
तुम्ही आमच्यापासून दूर असताना... - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)



Sunday, June 24, 2012

पावसा ....



आज बरसलास तू इतक्या दिवसांनी... 
का काहीच कसे वाटत नाही तुला,
कोण वाट पाहत असेल ... 
का जाणवत नाही तुला, 

एक तर आधीच असतोच...
फक्त तीनच महिने, 
त्यातपण तुझे आधीच...
ठरलेले असते उशिरा येणे.

तुझ्या चाहुलीनेच फक्त...
इथे कवींचे होते काव्यरूप बरसणे,
तुझ्या कल्पनेने सगळ्यांना...
अगदी चिंब चिंब भिजवणे.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Sunday, June 17, 2012

माझेच मन ते...

थोडा वेळ दिला मनाला ...
तिच्या विचारांमध्ये अंत घाठायला,
सगळ्यांपासून दूर....
क्षितिजात तिच्यासवे फिरायला.

मनानं मला एकटे केलं...
काही काळ दूर लोटलं होत,
तो तिच्या विचारात गुंग असे...
माझं मात्र त्याच्या परतीच वाट पाहण चालू होत 

अखेर तो आलाच...
गाठोड्यात सांर काही बांधून,
माझेच मन ते...
सांर काही ठेवलं माझ्यापुढ मांडून. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)