मी रोज ST ने प्रवास करणारा ट्रेन विषयी कसा काय कविता करू शकतो या बद्दल मला सांगावेसे वाटते, तर या कवितेच्या जन्मकथेविषयी सांगयचे तर
जानेवारी २०११ हा महिना मी कल्याण ते कुर्ला असा प्रवास केला आहे माझ्या जॉबच्या संदर्भात,
माझ्या जॉब विषयीच्या कारकिर्दीत हा माझा पहिलाच ट्रेन चा अनुभव. तेव्हा मी त्या एक महिन्यात जे काही मुंबईच्या लोकल ट्रेन बद्दल फक्त ऐकले होते ते अनुभवले.
ती गर्दी, सीट पकडायची चढाओढ, ट्रेन मध्ये चालणारी भजन कीर्तने, आदि सगळ्या गोष्टी मी पहिल्या. तेव्हा शब्द जुळले आणि ही कविता जन्माला आली पण पब्लिश करायला मला उशीर झाला. तेव्हा मुंबईकरांनो तुमच्या लाडक्या ट्रेनची कविता सादर करत आहे.