|| धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ||
रणांगणाची गर्जना, तलवारीच्या धारांची,
छत्रपतींची शपथ होती, स्वराज्याच्या शिखरांची!
शत्रूच्या छावण्यांमध्ये, भयाचे वादळ उठले,
सिंहासनास ताठ ठेवण्या, महाराज स्वप्नांत होते!
न झुकले ते छळांपुढे, ना मागे कधी हटले,
हिंदवीचा अभिमान होता, प्राणांहूनही मोठे!
कैदेतूनी घातक होते, त्या काळातील डाव,
पण छत्रपतींनी घेतले, स्वाभिमानाचा घाव!
सत्यासाठी प्राण गेले, पण तेज अमर राहिले,
हिंदवी रक्ताने लिहिले, छत्रपतींचे स्वराज्य जिंके!
- हर्षद कुंभार
No comments:
Post a Comment