All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Saturday, October 26, 2013

रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी



          एक गोष्ट जी सगळ्यांना काही गोष्ठीची अनुभूती करून देईल. आपण कुठे चुकतोय याची , आपण कोणत्या तत्वांवर, नियमांवर संस्कारांवर आपली घडी बसवली आहे याची. लहानपणापासून खूप गोष्टींचा बाऊ करून आपल्यावर संस्काराचे बाळकडू दिले जातात. तेच पूर्ण सत्य मानून आपण मोठे होतो आणि पुढेही तीच परंपरा चालू ठेवतो . त्यामुळे मोठ्यांना का म्हणून विचारले की ते वैतागतात किव्वा जेव्हडे सांगितले आहे तेवढेच लक्षात ठेवा बाकी चांभार चौकश्या नकोत. अशी जरब बसवली जाते. कारण त्यांनाही त्यामागचे शास्त्र माहित नसते अर्थात त्यांनाही दोष देण्यात काय अर्थ ना. ही परंपरा अशीच चालत आली आहे आणि राहील पण कदाचित.
      असो मुळात आता जी गोष्ट मी सांगणार आहे त्याने तुमच्या विचारांत बदल झाला तरी मला पुरुसे आहे. तर ही गोष्ट मी पुण्यात असताना वाचनात आली होती .

       "काही अभ्यासकांनी केलाला एक अभ्यास आहे त्यावरून घडलेली गोष्ट …
एका पिंजऱ्यात ५ माकडांना ठेवलेले असते. अभ्यासक नियमित त्या माकडांना केळी खायला देत असत. नंतर मग काही काळानंतर अभ्यासक त्यांना खायला देयला बंद करतात आणि पिंजऱ्याच्या मध्यभागी एक शिडी ठेवतात आणि पिंजऱ्याच्या वरच्या बाजूला केळी लटकवलेली दिसतील अशी ठेवतात. माकडांना कुठे काही खायला मिळत नाही, मग इथे तिथे पाहून अखेर त्यांना  केळी दिसतात आणि ते शिडी चढून केळी मिळवतात. अश्या प्रकारे त्या ५ माकडांना शिडी चढून केळी खायची सवयच लागते.
     आता अभ्यासक त्यांच्या या रोजच्या जगण्यात थोडा बदल करतात जेव्हापण ती माकडे त्या शिडीवर चढतील ना तेव्हा गरम पाण्याचा फवारा पिंजऱ्यात करतात. त्यामुळे गरम पाण्याने थोडं भाजायचे त्या माकडांना. माकडांच्या विचारशक्तीने त्यांच्या हे लक्षात येते की शिडी चढले की गरम पाणी अंगावर पडणार. त्यामुळे ती ५ माकडे शिडी चढायचा आप आपसात कोणालाच प्रयत्न करून देत नसत.
   आता अभ्यासक त्या ५ मधील ३ माकडे काढून नवीन ३ माकडे ठेवतात. त्यामुळे जुनी २ आणि नवीन ३ अशी ५ माकडे ठेवतात. त्यामुळे आता होते काय की हि नवीन ३ माकडे केळी खाण्यासाठी त्या शिडीजवळ जरी गेली तरी जूनी  २ माकडे त्यांना मारायची. असे सारखेच होऊ लागले.  त्या नवीन ३ माकडांना कळून चुकते शिडीजवळ काहीतरी आहे पण काय ते माहित नाही फक्त शिडी चढायची नाही किव्वा जवळ पण जायचे नाही हे मनाशी पक्के करून घेतात आणि शिडीजवळ जायचा नाद सोडतात.
    आता अभ्यासक पुन्हा बदल करतात जुन्या २ माकडांना कडून नवीन २ माकडांना पिंजऱ्यात ठेवतात म्हणजे आता २ नवीन माकडे आधीची नुकतीच ३ थोडी जुनी माकडे. तर आता पिंजरयातल्या नियमानुसार ही ३ माकडे त्या २ नवीन माकडांना पण त्या शिडीजवळ जाऊ देत नाहीत. त्यामुळे आता ५ ही माकडांना काहीच माहित नाही की शिडी जवळ गेल्यावर नक्की काय होते ते. फक्त एवढाच ना की काहीतरी असेल कदाचीत तिथे."
   तेव्हा आता तुम्ही विचार करा की हीच गोष्ट आपल्यासोबत पण झालीच आहे की नाही ते. रूढी - परंपरा या अश्याच पुढे आपल्यापर्यंत आल्या आहेत. मुळात त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार त्या रूढी-परंपरा जन्माला आलेल्या किव्वा बनवलेल्या गेल्या आहेत हे का आपल्या लक्षात येत नाही.

उदाहरण देयचे झाले तर आजही आपली वडिलधारी लोक आपल्याला सांगतात कि रात्रीची नखे कापू नये. आता का कुणालाच जास्त माहितपण नसेल.
   माझ्या माहितीनुसार जुन्याकाळी प्रकाशासाठी फक्त सूर्य हा एकच स्रोत्त्र होता अर्थात आग होती पण कोणी आग लावून नखे तर कापणार नाही न रात्री . रात्री अंधाराने नखे कापताना बोटांना इजा होऊ नये आणि कापून टाकलेली नखे कोणाच्या पायाला लागू नये हा त्यामागील उद्धेश होता. म्हणून रात्री नखे कपू नये हा नियम म्हणा की संस्कार लागू झाला तो आजवर तसाच आहे. अर्थात आपण आता प्रकाशासाठी सूर्यावर अवलंबून नाही पण आहे ते तसेच आहे ना.
या आणि अश्याच खूप गोष्टी आजही समाजमान्य अस्तित्वात आहेत. माझ्या मते आता आपण आपल्या रूढी -परंपरा , प्रथा संस्कार याला नवीन आधुनिक विज्ञानाची जोड देयला हवी त्यांचा अर्थ स्पष्ठ करण्याकरता. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)  
         

Sunday, October 20, 2013

Ek Kavita


किस्मत पर रोते हुए…
लोग अच्छे नही लगते ,
हात की लकीरोपें चले रस्ते…
पक्के नही लगते.

सिर्फ़ सच्चे दिल की
आवाज सुना करो…
क्योंकी प्यार की राह के फैसले
दिमाग सें नही लिया करते. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

Saturday, October 12, 2013

नैसर्गिक आपत्तीसम… प्रेम




खोल गहिऱ्या महासागरासम  
शांत निष्क्रिय जरी मी असलो … 
मनातल्या प्रेमाच्या लाटा मात्र 
तिच्या मनापर्यंत थडकत असतात. 

नैसर्गिक आपत्तीसम… 
जणू प्रेमसदृश्य मनाच्या क्रिया,
जश्या कोणीही रोखू शकत नाही … 
त्या प्रेम विरोधींना हतबल करूनच सोडतात. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).


प्रेमाचा उर्जास्त्रोत ....





त्यांना काय वाटत … 
भौतिक प्रेमाचा उर्जास्त्रोत बंद केल्याने … 
प्रेम म्हणून जन्माला…  
आलेले रोप वाढणार नाही,

वेडे आहेत रे ते लोक…  
त्यांना काय माहित … 
माणसाचं मन… 
स्वतःच एक उर्जास्त्रोत असते. - - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar).

Ek Kavita...


Ek Kavita - Harshad Kumbhar