All The Contents by Labels

Books Review/ पुस्तक परिक्षण (1) qoutes /सुविचार (1) इतर कविता (23) इतर कविता / General Poems (83) कविता/Poem (1) प्रेम कविता / Prem Kavita (59) प्रेम कविता /Love Poems (3) प्रेरणादायी कविता (3) प्रेरणादायी कविता / Inspiring Poems (9) मराठी कविता / Marathi Kavita (1) मराठी कविता / Marathi Poetry (1) मराठी कविता / Poems (1) मराठी कविता /Marathi Poem (1) मराठी कविता /Marathi Poetry (2) मराठी लेख / Articles (1) मराठी लेख / मराठी Articles / लघु कथा (2) मराठी सुविचार /Quotes (1) मैत्रीच्या कविता (7) मैत्रीच्या कविता / Friendship Poems (10) लेख /Articles (4) लेखन (8) लेखन / Marathi Lekhan (54) विचार / thoughts (1) विडंबन कविता (2) शायरी (1) सुविचार / One Liner (2) सुविचार / Quotes (2) सुविचार /Quotes (7) सुविचार/Quotes (1) हिंदी / Quotes (1) हिंदी Quotes (1) हिंदी कविता / Hindi Poems (2) हिंदी कविता /Hindi Poems (3) हिंदी कविता /Poems /Quotes (1) हिन्दी कविता / Hindi Poems (2)

Sunday, January 22, 2012

तुझं स्वप्न आणि माझं प्रेम


तुझं स्वप्न आणि माझं प्रेम 

तुझ्या स्वप्नांची उडान
खूप मोठी आहे 
त्यापुढे माझ्या प्रेमाची 
उंची थोडी लहान आहे.  

तुझ्या स्वप्नांच्या ...
आड मी येणार नाही,
माझ्या सावलीचही रूप 
तुला दाखवणार नाही. 

पण तुझी मी वाट 
पाहणार आहे,
तुला दिलेलं वचन
                 मी पाळणार आहे   - हर्षद कुंभार 

  

Monday, January 16, 2012

कल्याण स्टेशनला अनुभवलेले २ तास

    कल्याण स्टेशन 
वेळ रात्री : १२.०० - २.००

नमस्कार सगळ्यांना,
                             एक प्रसंग तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. खरतर या गोष्टीला आता बरेच दिवस म्हणजे महिने झाले आहेत.
माझा एक ट्रेकरचा ग्रुप आहे. आम्ही कुठे ना कुठे ट्रेकला जात असतो.  तसाच त्या वेळेस आम्ही चंदेरी गड सर करायचा बेत केला होता.
सगळे ठरल्याप्रमाणे झाले होते त्यानुसार मला कल्याण स्टेशन थांबायचे होते आणि  रात्री शेवटची गाडी २.०० ची जी कर्जतला जाते त्यासाठी वाट बघायची होती. बाकी माझे ग्रुप मेम्बर cst कडून येणार होते.
                         तर मी जेवण करून लवकरच निघालो होतो. st महामंडळाचा मला फार जुना आणि चांगलाच अनुभव असल्या कारणाने मी लवकरच निघणे पसंत केले. आणि त्यानुसार मी कल्याण स्टेशनला १२.०० पर्यंत पोचलो होतो. दिवसा दिसणारे कल्याण स्टेशन रात्री मात्र खूप वेगळे असते. मी तिकीट काढून फलाट क्र. २/३ ला गेलो. आधी कधी रात्री कल्याण स्टेशनला  न आल्यामुळे मला हा अनुभव नवीनच होता.            
तसे बघायला गेले तर कल्याण स्टेशन खूपच गलीच्ह आहे. सर्वत्र कचरा इथे तिथे पडलेला दिसत होता. सगळीकडे भिकाऱ्यांचा वावर असतो रात्री. तिथे बसायला म्हणजे बाकडे बघत असताना, माझ्या लक्षात आले की रेलवे पोलिसांनी नुकतीच त्या भिकाऱ्यांची फटके लगावून हकालपट्टी केली होती. कारण त्यातले बरेच जर हात पाय धरतच पुन्हा स्टेशनला त्यांच्या हक्काच्या घरी आले होते. स्टेशन म्हणजे त्यांचे घरच नाही का ?
                  प्रत्येकाची झोपायची जागा ठरलेली म्हणजे बाकडे ज्याने त्याने बुक केले असतील या अर्थाने. मी गेलो तेव्हा काहीजण झोपले  पण होते आणि काहीजण त्याच तयारीत होते. मी मात्र बसायला बाकडे बघत फिरत होतो स्टेशनला. शेवटी मला बाकडे दिसले जिथे आधीच २-३ प्रवासी बसले होते. तिथेच मी बसलो आणि आजूबाजूला माझे निरीक्षण चालू झाले. तिथे बाजूलाच त्या बाकडयाचे रात्रीचे हक्कदार कधीचे झोपण्यासाठी वाट बघत बसले होते. तिथे एक लहान भिकारी मुलगी साधारण वय असेल १०-१२ वर्ष तिथेच बसली होती. निरागसपणा हे लहान मुलांचे भाबडे रूप असते तसेच तिचेही होते.  तिथे  एका वयस्क भिकाऱ्याने तिला खायला म्हणून काहीतरी आणून दिले होते , पण कोण जाणे  तिने घेतले नाही आणि तशीच बसून होती. तिच्या हातात १ रुपयाच नाण होत, ती त्या नाण्याकडे एक - सारखी पाहत होती.  काय तुम्ही पण हाच विचार केला ना की त्या १ रुपयात ती काहीतरी खायला घेवून येईल. 
               पण पुढे चित्र वेगळेच दिसले, तुम्ही आणि मी जसा विचार करत होतो तसे काही घडलेच नाही. मी वाट बघत होतो की ही आता  जाईल नंतर जाईल, स्वतः साठी काहीतरी घेवून येईल. पण तिने एक धक्का देणारी गोष्ट केली, जवळच एक वजन मोजण्याचे मशीन होते 
तिने चक्क त्या १ रुपयाने स्वताचे वजन केले. माझ्यासाठी ते इतके विस्मयकारक  होते ना !. 
            तिच्या मनातले नेमके तसे करण्यामागचे  कारण काही झाल्या कळेनाच मला, मी विचारात असताना एव्हडे सगळे घडत असताना कधी २.०० वाजले कळलेच नाही. मित्रांनी पण फोन केला तयार रहा म्हणाले आणि त्या बाकड्यावरून मी उठलो,  नंतर कळले ते बाकडे त्या मुलीचे होते बिचारी माझ्यामुळे आणि इतर दोघांमुळे तिची  झोपायाची जागा आम्ही घेवून बसलो होतो. मी उठल्यावर ती शांतपणे जावून त्या बाकड्यावर  झोपली आणि मी २.०० ची गाडी पकडली आणि मित्रांमध्ये सामील झालो.  पुन्हा घरी आल्या नंतर मला त्या मुलीचे अप्रूप सारखे वाटत होते.  
            काही घटना मनाला खरच चटका लावून जातात तशीच ही एक - हर्षद कुंभार                              
      
    
  


Wednesday, January 11, 2012

कविता लिखता रहूँगा


हम तो उम्रभर 
प्यार के लिए तरसते रहे,
लेकिन प्यार तो नसीब में
लिखाही नही था,

मेरे रंग रूपसे शायद 
वो मुझे जांचती रही....
दिलका सच्चा प्यार उसने
परखाही नही था.

जिंदगी युही जिलेंगे 
तुम्हारी यादमें ....
कुछ और कविता 
                          लिखता रहूँगा तेरी प्यारमें .    - हर्षद कुंभार

Friday, January 6, 2012

इन्तेजार


राह देखते थक गई है आंखे,
साथ छोड़ दिया... 
जबाव दे रही है पल्खे,

ना करवावो इतना 
इन्तेजार हमसे...
अब एक जिंदगी  
जुड़ गई है तुमसे...

बैचैनसा होता है ...
हाल ए दिल बिन तुम्हारे,
अकेले रहे तो ...
कैसे खुद को हम सवारे.    

बाहें फैलाकर कर रहे है 
कबसे आपका इन्तेजार ,
कभी तो आओगी दौड़कर 
                        और मिट जाएगी दुरी की दिवार. - हर्षद कुंभार 
 
 

  

Thursday, January 5, 2012

I am always


My first poem in English , Dated 04-01-2012


I am always 
happy with the friends,
though they have hurt me.

I am always 
caring for the friends,
They haven't cared for me.

I am always 
asking for my friends ,
though they haven't ask me .  - harshad kumbhar 

Wednesday, January 4, 2012

मी हरवून बसलो...


कधी कधी एकटा 
बसलेलो असतो मी...
सर्व नाती ,गोती, मैत्री
विसरत चाललो आहे मी,

रस्त्याला चालत असताना... 
आजूबाजूचे भान राहत नाही,
लांब जाणाऱ्या रस्त्याची...
अजून कुणाची साथ नाही.  

ह्या माणसांच्या गर्दीत...  
धुरकट होत चालले आहे मी,
माझा मीपणा हरवून बसलो... 
असे कसे घडले हेच विसरलो आहे मी  

मुळ संकल्पना : शैलेश कुंभार 
सुधारणा : हर्षद कुंभार    

Monday, January 2, 2012

त्या वळणावर...


खूप काही आठवावे असे 
खूप आहे त्या वळणावर...
क्षितिजाला भिडणारे असे 
स्वप्न आहे त्या वळणावर ... 

जगण्याची नवीन दिशा 
आहे त्या वळणावर ...
अंत नसला तरी सुंदर 
                      पहाट आहे त्या वळणावर...   - हर्षद कुंभार 

दिल भी अजीब है...


बेहने दो आंसुको आज...
कोई तो करेगा इन आंसुपे नाज,

इस प्यार को 
ना समझ सका कोई,
इन निगाहोमे 
ना बसा आजतक कोई. 

दिल भी अजीब है... 
आ जाता है किसीपेभी,
                          जानवाली हो , या हो अजनबी   - हर्षद कुंभार